पुणे : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा मागील तीन दिवसापूर्वी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात कपडे बदलताना अश्लील व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली असुन पोलिसांना ‘कृती कार्यक्रम’ जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य महिला आयोग्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पात्राद्वारे व ट्विटद्वारे पोलिसांना महत्वाच्या सूचना देखील देण्यात आलया आहेत.
लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे.
एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील, असे चाकणकर यांनी ट्वीटद्वारे सांगितले आहे.
महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे. १/३ @MahaCyber1 @DGPMaharashtra
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 26, 2023
याप्रकरणी गौतमी पाटील यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर तिच्या २६ वर्षीय तरुणीने विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलीस ठाण्यात तीन इन्स्टाग्राम अकाऊंट असलेल्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीने गौतमी पाटील ही कपडे बदलत असताना तिचे व्हिडीओ चित्रित तो इन्स्टाग्राम व व्हॉट्सअपवर प्रसारित केला. तसेच फिर्यादी व इतर सहकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.