Gautami Patil राहु : गौतमी पाटील हिच्या नृत्याची भुरळ तरुणाईला चांगलीच पडली आहे. गौतमीचा कार्यक्रम म्हटले की गर्दी आणि गोंधळ आता हे समीकरणच झाले आहे. अशाच एका गौतमीच्या कार्यक्रमाच गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपळगाव ता दौंड येथे गारदीबाबा यात्रेच्या निमित्ताने तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शांतता होती मात्र अर्धा तासानंतर अचानक स्टेजच्या उजव्या कोपऱ्यातील तरुण प्रेक्षक उभे राहिल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. .
यावेळी वेळीच यवत ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक संयोजकांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरळीत सुरू झाला. मात्र पुन्हा काहीतरी झाल्याचे निमित्त करत तरुण उभे राहिले होते. यामुळे गौतमी पाटील यांचा कार्यक्रम थांबवावा लागला. संयोजकांनी पुन्हा एकदा सूचना दिल्यानंतर हा कार्यक्रम सुरू झाला. मात्र शेवटी कार्यक्रमाच्या सांगते वेळी सर्व प्रेक्षक उभे राहिले असतानाच दोन गीते गौतमी पाटील यांनी सादर केली व कार्यक्रमाची भैरवी घेतली.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतम पाटील हिची मोठ्या प्रमाणावर क्रेज असल्यामुळे सिद्धेश्वर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जवळपास दहा हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होती.सोशल मीडियावर गौतमीचा मी पिंपळगावला येणार अशा प्रकारचे संदेशही फिरत होते.
महिलांची उपस्थिती लक्षणीय…!
परिसरातील तरुणांच्या बरोबर महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. स्थानिक संयोजकांनी कार्यक्रमासाठी स्टेज उंचावर घेतला होता तसेच सुमारे तीस फुट दुर अंतर ठेवण्यात आले होते. बंदोबस्तासाठी यवत पोलीस स्टेशनचे दुय्यम उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह सहा कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता असल्यामुळे तसेच बेशिस्त पार्कीगमुळे रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. कार्यक्रम दरम्यान गैरसमजातुन प्रेक्षक उभे राहीले मात्र यावेळी कोणताही वाद झाला नसल्याने संयोजकांनी व पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.