चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पुरस्कार सोहळा ‘फिल्मफेअर‘ नुकताच गुजरातमध्ये पार पडला. यंदाचा हा 69वा फिल्मफेअर पुरस्कार होता. या सोहळ्यात अभिनेता रणबीर कपूर आणि पत्नी आलिया भट्ट यांनी बाजी मारली. तर ‘ॲनिमल’ आणि ’12th फेल’ या दोन चित्रपटांचा बोलबाला पहायला मिळाला. ‘ॲनिमल’ने एकूण सहा पुरस्कार आपल्या नावे केली. चला तर पाहूयात विजेत्यांची यादी.
विजेत्यांची यादी खालील प्रमाणे
सर्वोत्कृष्ट चित्रपट (लोकप्रिय)- 12th फेल
सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स)- जोराम
सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर (ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)- विक्रांत मेस्सी (12th फेल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स)- राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे) आणि शेफाली शाह (थ्री ऑफ अस)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- विधू विनोद चोप्रा (12th फेल)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विकी कौशल (डंकी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम- ॲनिमल (प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भुपिंदर बब्बल, अशिम केमसॉन,
हर्षवर्धन रामेश्वर, गुरिंदर सैगल)
सर्वोत्कृष्ट गीत- अमिताभ भट्टाचार्य (तेरे वास्ते- जरा हटके जरा बचके)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- भुपिंदर बब्बल (अर्जन वेल्ली- ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- शिल्पा राव (बेशरम रंग- पठाण)
सर्वोत्कृष्ट कथा- अमित राय (ओएमजी 2)
सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले- विधू विनोद चोप्रा (12th फेल)
सर्वोत्कृष्ट संवाद- इशिता मोईत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- हर्षवर्धन रामेश्वर (ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- अविनाश अरुण धावरे (थ्री ऑफ अस)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- सुब्रता चक्रवर्ती आणि अमित राय (सॅम बहादूर)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग- जसकुंवर सिंह कोहली- विधू विनोद चोप्रा (12th फेल)
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन- सचिन लवेलेकर, दिव्या गंभीर आणि निधी गंभीर (सॅम बहादूर)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन- कुणाल शर्मा (एमपीएसई) (सॅम बहादूर) आणि सिंक सिनेमा (ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- गणेश आचार्य (व्हॉट झुमका- रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट ॲक्शन- स्पायरो राझाटोस, अनल अरासू, क्रेग माक्रे, यानिक बेन, केचा खांफाकडे, सुनील रॉड्रीगज (जवान)
सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स- रेड चिलीज व्हीएफएक्स (जवान)
पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- तरुण दुदेजा (धकधक)
पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेता- आदित्य रावल (फराझ)
पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- अलिजेह अग्निहोत्री (फर्रे)
जीवनगौरव पुरस्कार- डेव्हिड धवन
आगामी संगीत प्रतिभेसाठी आरडी बर्मन पुरस्कार: श्रेया पुराणिक (सतरंगा- ॲनिमल)