Film News मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ कायमच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. (Film News) या मालिकेला सुरूवातीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले, पण आता या मालिकेवर प्रेक्षक नाराज झाले आहेत. (Film News) या मालिकेतील अनिरूद्धचा स्वतःवर ताबा नाही, चुकीचे धडे शिकवतो, यावर प्रेक्षक संतापले आहेत. (Film News)
या मालिकेची कथा भरकटत चालली असून, समाजाला काय संदेश देत आहात? असा सवाल विचारला जात आहे. अरुंधती या मालिकेतील आई तिच्या आयुष्यात अनेक वादळे आली तरीही ती न डगमगता उभी आहे. तिला नाती जोडायला खूप आवडतात. तर अनिरूद्ध अरुंधतीला अंधारात ठेवून संजनावर प्रेम करतो व लग्न करतो. आता वीणा बरोबर मैत्री करत आहे.
सध्या मालिकेत वीणाला आशुतोषचा मित्र निखिल मानसिक त्रास देतो, तेव्हा अनिरूद्ध निखिलला मारायला जातो, तेव्हा अरुंधती येते आणि अनिरूद्धला कानाखाली मारते, तेव्हा अनिरूद्ध पुन्हा अरुंधतीवर हात उचलतो हे पाहून प्रेक्षक संतापले आहेत. या सर्वावरून ‘आई कुठे काय करते’ची कथा भरकटत चालल्याचे दिसून येत आहे.