Film News : मुंबई : ‘कर्मा’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक चित्रपट आहे, जो कथा, पात्र, संवाद आणि संगीतासाठी ओळखला जातो. देशभक्तीच्या भावनेने पूर्ण अशा ‘कर्मा’ने रिलीज होऊन 37 वर्षे पूर्ण केली आहेत. पण याच चित्रपटादरम्यानचा किस्सा सुभाष घई यांनी शेअर केला आहे. सुभाष घई हे जेव्हा दिलीप कुमार यांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा ते चांगलेच घाबरले होते. (Film News)
दोन दिग्गजांच्या भेटीला त्यांनी सिनेमाचा ‘विजय’ असे वर्णन
नूतन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासह दारा सिंग आणि शक्ती कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्याचं संगीतही खूप प्रसिद्ध झालं होतं. देशभक्तीच्या सार्वजनिक कार्यक्रमात आजही ‘हर करम अपना करेंगे…’ हे गीत वाजवले जाते. हा चित्रपट जितका रंजक होता तितकाच त्याच्या निर्मितीच्या कथाही रंजक आहेत. खास करून दिलीप कुमार आणि सुभाष घई यांच्या भेटीचा किस्सा सायरा बानो यांनी सोशल मीडियावरून शेअर केला होता. या दोन दिग्गजांच्या भेटीला त्यांनी सिनेमाचा ‘विजय’ असे वर्णन केले. (Film News)
ऐंशीच्या दशकाची गोष्ट आहे. दिलीप कुमार बंगलुरु येथे होते. सुभाष घई त्यांच्या नवीन चित्रपटाची स्क्रिप्ट सांगण्यासाठी त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट वितरक अयान मांद्रे यांच्यासोबत बंगलुरुला गेले होते. सुभाष घई हे पहिल्यांदाच दिलीप कुमार यांच्यासमोर उभे होते. त्यामुळे ते चांगलेच अस्वस्थ होते. पण जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर जे काही यश मिळाले, त्यानंतर या दोन्ही कलाकारांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं. (Film News)