Film News मुंबई : महाराष्ट्राच्या मातीतून अनेक वीर-जवान घडले आहेत. मात्र, ते कसे घडतात, त्यांचा तो प्रवास जाणून घेण्यासाठी लवकरच रुपेरी पडद्यावर एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचं नाव आहे. (Film News) ‘बटालियन 60’. ‘किंग प्रोडक्शन’ आणि आणि तुषार कापरे पाटील प्रस्तुत हा चित्रपट असून, याचे दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील आहेत. (Film News)
आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास लाभला आहे. या मातीतील वीर पुत्रांनी इतिहासाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे, याचे अनेक धडे आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. मराठमोळ्या मातीत तयार झालेल्या एका शूर वीर नायकाची कथा या चित्रपट मांडण्यात येत आहे. शून्यापासून प्रयत्न करून हे शूर वीर कसे घडत जातात, याच हुबेहूब वर्णन या चित्रपटात करण्यात आले आहे.
जवानांच्या खडतर प्रवासाचे वर्णन
महाराष्ट्रातील काही गावं सैनिक भरतीसाठी प्रसिद्ध असून, त्या गावांत प्रत्येक घरातून एकतरी माणूस सैन्यात तैनात असतो. या जवानांना ट्रेनिंग कसे व कुठे मिळते. तसेच त्यांचा खडतर प्रवास कसा असतो हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटाचे पोस्टर रिलीज
या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले. या पोस्टरमध्ये पाठमोरा वीर पाहायला मिळत आहे. तसेच बॉर्डरवर हातात बंदूक घेऊन सैनिक दिसत आहेत, यावरून चित्रपटात एका शूर सैनिकांची गाथा पाहायला मिळणार असल्याचे दिसतंय. ‘बटालियन 60’ हा चित्रपट एका शूर सैनिकाची कथा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.