मुंबई : कोरिओग्राफर फराह खान आणि अभिनेता साजिद खान यांच्या आईचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. मेनका खान असे त्यांच्या आईचे नाव आहे. आईचं छत्र हरपल्याने कोरिओग्राफर फराह खान यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मेनका या बालकलाकार हनी इराणी आणि डेसी इराणी यांच्या बहिण होत्या.
दरम्यान, फराह खान यांनी दोन आठवड्यांपूर्वीच (दि.12 जुलै) त्यांच्या आईचा 79 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी आईसाठी खास पोस्ट लिहून त्यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. फराह खान यांनी आईविषयी एक पोस्ट लिहिली होती, त्यात “आपण कायमच आपल्या आईला गृहीत धरत आलोय. विशेषत: मी जास्तच गृहीत धरलयं. मला गेल्या महिन्यात जाणीव झाली की माझी आईवर माझं किती प्रेम आहे. माझी आई खूप स्ट्रॉंग आहे. तिच्याशिवाय हुशार व्यक्ती मी दुसरीकडे कुठे पाहिली नाही. वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा आई.”
लोकप्रिय कोरिओग्राफर फराह खान आणि अभिनेता साजिद खान यांना अचानक आईचे निधन झाल्यामुळे धक्का बसला आहे.