Ram Narayan : भारतीय संगीतकार प्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण यांचं 9 नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. राम नारायण यांची वयाच्या 96 व्या वर्षी प्राण ज्योत मालवली. सारंगी वादक राम नारायण यांनी भारतीय संगिताला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवणारे ते पहिले भारतीय संगीतकार होते. राम नारायण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रासह बॉलिवूड इंडस्ट्रीवरही शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.
राम नारायण यांचा जन्म 25 डिसेंबर 1927 रोजी उत्तर-पश्चिम भारतातील उदयपूरजवळील आमेर गावात झाला होता. त्यांचे आजोबा हरलालजी बियावत आणि वडील नथुजी बियावत शेतकरी आणि गायक होते. नथुजी बियावत हे दिलरुबा वादक होते. तसेच नारायण यांची आई संगीतप्रेमी होत्या. त्यांचे आजोबा बगाजी बियावत हे आमेरचे गायक होते. राम नारायण हे पंडित म्हणून ओळखले जात असत. राम नारायण हे असे भारतीय संगीतकार होते, ज्यांनी सारंगीला भारतीय शास्त्रीय संगीतातील एकल वाद्य म्हणून लोकप्रिय केलं आणि ते पहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी सारंगी वादक ठरले.
Sangeet Natak Akademi and its associate bodies deeply mourn the sad demise of Ram Narayan, the renowned Hindustani musician and sarangi virtuoso. A recipient of the Padma Vibhushan and the Sangeet Natak Akademi Award, he passed away today.
Heartfelt condolences to the bereaved… pic.twitter.com/6Ku8tPEyUZ
— Sangeet Natak Akademi (@sangeetnatak) November 9, 2024
पद्मविभूषणने सन्मानित..
संगीतकार राम नारायण 1956 मध्ये सोलो कॉन्सर्ट करणारे पहिले कलाकार बनले. त्यानंतर त्यांनी भारतातील अनेक प्रमुख संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केले. त्यांनी अनेक अल्बम रेकॉर्ड केले आहेत. 1950 च्या दशकात शंकरसोबत दौरा केला. त्यांनी अनेक भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना सारंगी वादन शिकवलं आहे. 2005 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.