पुणे: “फँड्री” चित्रपटातील शालूच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने अलिकडेच सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. पोस्टमुळे अभिनेत्रीने धर्म परिवर्तन केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. राजेश्वरीने पोस्टमध्ये बाप्तिस्माचा उल्लेख केला आहे. राजेश्वरीने सोशल मीडियावर एक फोटो शेयरकरून ‘Baptised’ असे कॅप्शन दिले आहे. पोस्ट केलेल्या फोटोमुळे तिच्या धर्म परिवर्तनाबद्दलच्या चर्चांना उधान आले आहे. राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून स्पष्ट केले की, तिचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला होता, ज्यामुळे या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
येथे पाहा, फोटो
बाप्तिस्मा हा ख्रिश्चन धर्मातील एक महत्त्वाचा विधी असून व्यक्तीला पाण्यात बुडवून किंवा पाणी शिंपडून ख्रिश्चन म्हणून ओळख दिली जाते. हा विधी नवीन जीवनाची सुरुवात आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी केला जातो. ख्रिस्तामध्ये नवीन जीवनाचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आणि ख्रिस्त व त्याच्या लोकांप्रती औपचारिक वचनबद्धता दर्शवणारा हा विधी आहे. राजेश्वरी खरात ही एक प्रतिभावान मराठी अभिनेत्री आहे जिला “फँड्री” मधील तिच्या भूमिकेसाठी ओळख मिळाली. ती चित्रपट उद्योगात सक्रिय काम करत आहे.