मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री शोभिता आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे. शोभिता शिवन्नाचा मृतदेह तिच्या घरात आढळला आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.
शोभिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात पाठवण्यात आला. तिचे पार्थिव बेंगळुरूला नेण्याची व्यवस्था केली जात आहे, तिथेच तिचे अंतिम संस्कार केले जातील. दरम्यान, शोभिताच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कर्नाटकातील हसन जिल्ह्यात सकलेशपूर येथील रहिवासी असलेल्या शोभिता शिवन्नाचं लग्न झालं असून ती गेल्या दोन वर्षांपासून हैदराबादमध्ये राहत होती. मात्र, तिच्या दुःखद मृत्यूमागची कारणं अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
प्राथमिक तपासात शोभितानं आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 30 नोव्हेंबरच्या रात्री अभिनेत्रीने स्वतःला संपवलं असं देखील सांगण्यात येत आहे. पण अभिनेत्री इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.