पुणे : वाघाचा जवळून व्हिडिओ काढणे बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हीला महागात पडले आहे. त्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. फॉरेस्ट रिजर्व अथॉरिटीजने विरोध केला आहे. टायगर रिजर्व मॅनेजमेंटने जीपच्या ड्रायव्हर, ड्यूटीवर असलेले अधिकाऱ्यांना नोटिस पाठवली आहे. त्यांचाही तपास करण्यात येणार आहे.
रवीनाचा मध्य प्रदेशमधील सातपुडा टायगर रिजर्वच्या सफरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.त्यामुळे ती वादात सापडली आहे. हा व्हिडीओ रवीनानेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. ज्यामुळे आता ती वादाच्या कचाड्यात सापडली आहे.
या सफरीदरम्यान रवीनाची जीप वाघाच्या खूप जवळ आहे. कॅमेरा सटर्सचा आवाज देखील व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. व्हिडीओमध्ये दोन-तीन वाघ दिसत आहेत. याप्रकरणाबाबत सातपुडा टायगर रिजर्वचे उपसंचालक संदीप यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रवीना टंडनने टायगर रिजर्वला भेट दिली होती. त्याप्रकरणाचा तपास केला जाईल. तसेच रवीना टंडन तिथे आली तेव्हा जो ट्रायव्हर आणि गाईड होते त्यांची देखील चौकशी केली जाईल.
हे प्रकरण पाहून रवीनाने देखील टि्वट केलंय, त्यात तिने लिहिलंय की, वाघ जिथे फिरतो तो तिथला राजा असतो. आपण त्यांना हळूच पाहतो. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये तिने लिहिलंय की, “कोणीही विचार करु शकत नाही वाघ कधी आणि कशाप्रकारे काय करेल. ती वनविभागाच्या परवाण्याची गाडी आहे. त्यांचे गाईड आणि ड्रायव्हर असतात. ज्यांना तिथले नियम आणि ठाऊक असतात. सुदैवाने आम्ही अशी काही हलचाल केली नाही. आम्ही तिच्या वाटेला गेलो नाही फक्त तिला शांतपणे पाहत राहिलो.यापुर्वीही केटी वाघिणीच्या वाहनांजवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत.”