Entertainment News : मुंबई : आजही मुंबईमध्ये येण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. पण अभिनेते किरण माने यांनी मुंबईमध्ये कधीच राहणार नाही, असे सांगितले आहे. किरण माने यांनी ‘बिग बॉस मराठी ४’ मधून स्वतःचं अनोखं स्थान निर्माण केलं. किरण माने यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी बिग बॉसमधुन दमदार खेळ केला. किरण माने ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याआधी ‘मुलगी झाली हो’ मालिकेत काम केले.
मला माझ्या साताराच्या मातीची ओढ आहे
किरण मानेंनी त्यांचं जन्मस्थान साताऱ्याबद्दल खास पोस्ट केलीय. किरण माने लिहितात, ‘लोकं म्हणत आहेत की सारखं शुटिंगसाठी मुंबई-सातारा-मुंबई…कशाला एवढी दगदग करत असता? (Entertainment News) मुंबईत शिफ्ट व्हा की फॅमिली घेऊन. खरंतर मुंबई खूप आवडते. नाटका-सिनेमात रमणारी ! जगातलं हे एकमेव शहर असं असेल, जिथं रोज, कुठं ना कुठं, कुठल्या ना कुठल्यातरी नाटकाचा प्रयोग असतो. हे कसलं भारी आहे, हे माने पुढे लिहितात.
सातारा म्हणजे काळजाचा तुकडा आहे आपल्या. गेली दहा वर्षे मी नाटक-सिनेमा सिरीयलच्या निमित्तानं हळूहळू मुंबईत बिझी होत गेलो. पण शुटिंग-नाटकाचं प्रयोग करून परत सातारला येताना लिंबखिंडीतनं साताऱ्याकडं बघितल्यावर जे वाटतं मला, ते शब्दांत नाय सांगू शकतं. त्यामुळे मला मुंबई कितीही आवडत असली तरीही मी मुंबईमध्ये राहणार नाही. (Entertainment News) मला माझ्या साताराच्या मातीची ओढ आहे, असे माने यांनी म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Entertainment News : आज अभिनेता असलेला चंद्रचूर सिंग एकेकाळी करायचा युपीएससीचा अभ्यास
Entertainment News : सिंधूताई माझी माई’ मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला