नवी दिल्ली: नोएडा येथील रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या यूट्यूबर एल्विश यादवला स्थानिक पोलिसांनी रविवारी चौकशीनंतर अटक केली आहे. प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलेला विषाचा नमुना कोब्राचा होता, हे फॉरेन्सिक अहवालाने स्पष्ट झाले आहे.
रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. प्रसिद्ध युट्युबर एल्विश यादव हा देखील या प्रकरणात आरोपी आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल यादव नावाच्या एका आरोपीसह पाच जणांना यापूर्वीच अटक केली आहे.
मात्र, एल्विश यादव यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हणत सर्व आरोप फेटाळले आहेत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात नोएडामधील रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा पुरवठा केल्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या एका युट्युबरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला होता आणि एका संस्थेवर त्याला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप केला होता.
दरम्यान रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर एल्विशने 13 मिनिटे 34 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे की, जेव्हा नोएडामध्ये रेव्ह पार्टी होत होती, त्यावेळी तो मुंबईतच होता. तसेच या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे एल्विशने म्हटले आहे. हे प्रकरण आहे. फॉरेन्सिक अहवालाने पुष्टी केली की, प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलेला विषाचा नमुना कोब्राचा होता.
रेव्ह पार्टीत होतो हे पोलिसांनी आधी सिद्ध करावे, असे एल्विशने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ज्या पीपल फॉर ॲनिमल्स संस्थेने गुन्हा दाखल केला आहे, त्यांचे काम प्रसिद्ध लोकांवर विनाकारण आरोप करत पैसे उकळण्याचे आहे, असा आरोप त्याने केला. एल्विश यादव याने केलेल्या आरोपांवर पोलिस उपायुक्त विद्या सागर मिश्रा यांनी पुरावे गोळा केले जात असून, त्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते.