पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे लाखो चाहते आहेत.नानांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आलं आहे.
नाना पाटेकर यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. पण त्यांचा मुलगा काय करतो, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
नाना पाटेकर यांचा मुलगा देखील हुबेहुब त्यांच्या सारखा दिसतो. नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती हे वेगळे झाले आहेत. मल्हार हा त्यांचा दुसरा मुलगा आहे. त्यांचा पहिल्या मुलाचा मृत्यू झाला होता.
नाना पाटेकर यांच्या मुलाचं नाव मल्हार पाटेकर आहे.मल्हार पाटेकरला देखील चित्रपटांमध्ये काम करायची आवड आहे.त्याला अभिनयापेक्षा चित्रपटात निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करायला मल्हारने पसंती दिली आहे.
त्याने ‘द अटॅक ऑफ 26/11’ या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. त्याचा प्रोडक्शन हाऊसचं नाव नाना साहेब प्रोडक्शन हाऊस आहे.