मुंबई : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या घरी लक्ष्मीच आगमन झालं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिका आणि रणवीर यांच्या बाळाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता डिलिव्हरीच्या नऊ दिवसांनंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर ती आपल्या चिमुकली परी आणि कुटुंबासह घराकडे रवाना झाली आहे, ज्याचे फोटो अलीकडेच सोशल मीडियावर समोर आले आहेत.
आईवडील झाल्यानंतर दीपिका आणि रणवीरची पहिल्यांदाच झलक त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक, कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची गाडी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मीडियाच्या कॅमेऱ्यात दिसली. मुंबईती रुग्णालयातून दीपिका आणि रणवीर त्यांच्या बाळासह घराकडे रवाना झाले आहेत.
अशातच दीपिकाने आपल्या बायोमध्ये बदल केला असून तिने तिचं नवीन रुटीन सांगितलं आहे. दीपिकाने तिच्या बायोमध्ये लिहिलयं, ‘फिड, बर्प, स्लीप, रिपीट’. दीपिकाचा बदललेला बायो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram