मुंबई – तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमधून घराघरात पोहोचलेल्या दयाबेन म्हणजेच दिशा वकानीला घशाचा कर्करोग झाला असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. मात्र याबदल दिशाचा भाऊ मयूर आणि तिच्याबर अनेक वर्ष काम करणारे जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांनी खुलासा केला आहे.
दिलीप जोशी म्हणाले की, ‘मला सकाळपासून सतत फोन येत आहेत. मला वाटतं त्याचा प्रचार करण्याची गरज नाही. मी एवढेच म्हणेन की, या सर्व अफवा आहेत. तुम्ही सर्वजण अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नका. असे दिलीप जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
दिशाचा भाऊ मयूरने यांनी सांगितले की, ही संपूर्ण अफवा आहे आणि मी दिशाच्या चाहत्यांना विनंती करतो की अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अजिबात घाबरू नका. मी दिशाच्या संपर्कात आहे आणि या कॅन्सरच्या बातमीत काही तथ्य असेल तर ते जाणून घेणारी मी पहिली व्यक्ती असेन. दिशा पूर्णपणे ठीक आहे आणि खरे सांगायचे तर तिला अफवांना कसे सामोरे जावे हे माहित आहे. अशी माहिती मयूरने देऊन सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान दिशा २००८ पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करत होती. तिने सप्टेंबर 2017 मध्ये म्रटर्नीटी लिव्ह घेतली आणि त्यानंतर ती 5 महिन्यांनंतर शोमध्ये परतणार असल्याचे बोलले जात होते. मात्र ती या शोमध्ये अजूनही परत आलेली नाही.