मुंबई : बॉलिवूड सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्याविषयी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सुभाष घई यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लिलावती रुग्णालयात सुभाष घई यांच्यावर डॉ. रोहित देशपांडे यांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. घई यांच्या पीआर टीमकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली आहे. “सुभाष घई हे पूर्णपणे ठीक आहेत. त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती ठीक आहे”, अशी माहिती समोर येत आहे.
सुभाष घई यांना श्वासासंबंधी तक्रारी, अशक्तपणा, सतत चक्कर येणे, स्मृती कमी होत जाणे आणि बोलताना अडचण येणे अशा अनेक समस्या त्यांना जाणवू लागल्या. दोन दिवसांनी त्यांना आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचीही शक्यता आहे.