Anupam Kher : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी फोटोज तर कधी व्हिडिओज. अशातच सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत 500 च्या नोटा असून बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांचा फोटो त्यावर दिसत आहे. ज्याचा व्हिडिओ अभिनेत्याने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर करून आश्चर्य व्यक्त केले आहे
सोशल मीडियावर व्हायरल होणा-या या व्हिडिओमध्ये पाहताच, ही नोट हुबेहूब खरी दिसत आहे. मात्र तसेच नसून नोटेचे डिझाईन पाचशे रुपयांच्या नोटेसारखे आहे. मात्र या नोटांवरील फोटो वेगळा आहे. यावरुन ही नोट खोटी असल्याचे स्पष्ट होते. तसेच या व्हायरल होणा-या नोटेवर रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडिया’च्या जागी ‘रिसोल बॅंक ऑफ इंडिया’ लिहिलेलं आहे. हा प्रकार गुजरात येथे घडला, तिथे या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत पण त्यांचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत.
अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, घ्या बघा…. 500 रुपयांच्या नोटेवर गांधीजींच्या फोटोऐवजी माझा फोटो? काहीही होऊ शकते.’
आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नुकताच 22 सप्टेंबर रोजी गुजरातच्या सुरत पोलीसांनी बनावट नोटा बनवणा-या टोळीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी पोलीसांनी चार आरोपींनी अटक केली होती . त्यांनी जवळपास 1 कोटी 60 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत.
View this post on Instagram