मुंबई : बॉलिवूड स्टार अनुपम खेर यांच्या मुंबईतील कार्यालयात चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी चोरांनी चार लाख रुपयांची चोरी केली आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अनुपम खेर यांनी स्वत: या घटनेची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे. त्यांनी स्वत: पोलिसांना या विषयी माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे.
कल रात मेरे वीरा देसाई रोड वाले ऑफ़िस में दो चोरों ने मेरे ऑफ़िस के दो दरवाज़ों को तोड़ा और अकाउंटस डिपार्टमेंट से पूरा सेफ़ (जो शायद वो तोड़ नहीं पाये) और हमारी कंपनी द्वारा निर्मित एक फ़िल्म के नेगेटिव जो एक बॉक्स में थे, चुराकर ले गए।हमारे ऑफिस ने FIR करवा दिया है।और पुलिस ने… pic.twitter.com/aqmjfOINEM
— Anupam Kher (@AnupamPKher) June 20, 2024
अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरीची घटना ही (दि.19 जून) बुधवारी रोजी घडली होती. सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोर सामान घेऊन पळून जाताना दिसत आहे. अनुपम खेर यांनी एक्स मिडियावर पोस्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर यांच्या कार्यालयाचा दरवाजा तोडला आहे.
पोस्ट शेअर करताना, त्यांनी म्हटलं आहे की, बुधवारी चोरांनी मुंबईतील त्यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि कार्यालयातील महत्त्वाच्या वस्तू चोरल्या. 19 जून बुधवारी रोजी दोन चोरट्यांनी मुंबईतील कार्यालयात घुसून तेथे असलेल्या चित्रपटाचे निगेटिव्ह जे एका बॉक्समध्ये होते ते चोरून घेऊन गेले. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, सकाळी 9.45 वाजता कार्यालयातील कर्मचारी आले असता त्यांना कुलूप तुटल्याचे दिसले. त्यानंतर खेर यांच्या कार्यालयाने एफआयआर दाखल केला. याप्रकरणी आंबोली पोलीसांनी अज्ञातांविरुद्घ गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी तपास सुरु आहे.