मुंबई : बिग बॉस मराठीचे यंदाचे पाचवे पर्व सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. अशातच दोन आठवड्यापूर्वी वाईल्ड कार्ड एन्ट्रीसह बॉडी बिल्डर संग्राम चौगुले बिस बॉसच्या घरात आले होते. पण आता दोन आठवड्यात त्यांना घराबाहेर पडावे लागले आहे.
शनिवारच्या भागामध्ये संग्राम चौगुले त्याला घराबाहेर काढण्यात आले आहे. संग्रामला मागील आठवड्यामध्ये एका टास्कमध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती असे सांगण्यात आले होते. त्यामुळे वैदकीय उपचारासाठी संग्रामला घराबाहेर काढण्यात आले आहे. या दुखापतीमुळे संग्राम यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागणार असल्याचे बिग बॉसने सांगितले आहे. याच कारणामुळे संग्राम यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.
आता त्यानंतर आता बिग बॉसचे प्रेक्षक बिग बॉसला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. त्यामुळे एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, “ह्या स्क्रिपटेड शो चा कॉन्ट्रॅक्ट संपला आहे ते सांगा सगळ्या प्रेक्षक वर्गाला समजले आहे तुमचा शो स्क्रिप्ट आहे म्हणून”, तर दुसऱ्या युझरने लिहिलं आहे की, म्हणजे अरबाज वाचला, व्हा रे बिग बॉस तुमची शाळा.
दरम्यान, आर्या जाधव हिला देखील सातव्या आठवड्यानंतर बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या मतांमुळे नाही, तर घरात हिंसाचार केल्याने बाहेर पडावे लागले होते. तिने निक्की तांबोळी हिच्या कानाखाली मारल्याने तिला घराबाहेर जावे लागले होते.
View this post on Instagram