Bigg Boss 17 : मुंबई : ‘बिग बॉस’चा १७ वा सीझन कपल जोडप्यांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. आपल्या विशेष खेळीवर बिग बॉसमधील प्रत्येक स्पर्धकाने वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. ‘पवित्र रिश्ता’फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेही आपला पती विकी जैनबरोबर बिग बॉसच्या १७ व्या पर्वात सहभागी झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांच्यात प्रचंड वाद होताना दिसत आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरून एक वेगळीच चर्चा रंगल्याचं बघायला मिळत आहे. बिग बॉसच्या घऱात अंकिता गुडन्यूज देणार असल्याचही बोललं जात आहे. त्यावर आता बिग बॉसमधून बाहेर निघालेल्या नावेद सोलने मोठा खुलासा केला आहे
अंकिता लोखंडेच्या गरोदरपणावर नावेद भाष्य करताना म्हणाला की, “सध्या सगळं काही सकारात्मक दिशेने जात आहे. अंकिताने मला वचन दिले की, ती तिच्या बाळाचे नाव ठरवताना माझी मदत घेईल. अंकिताच्या बाळासाठी आम्ही हिंदी आणि पाश्चिमात्य नावांचे मिश्रण करून नवीन नावाची निर्मिती करणार आहोत. माझ्या मनात काही नावे आहेत, पण योग्य वेळ आल्यावरच मी ती शेअर करेन. याबद्दल मी खूप उत्सुक आहे. ”
या महिन्याच्या सुरुवातीला बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये अंकिता तिचा पती विकी जैनसोबत तिच्या मूड स्विंगबद्दल बोलताना दिसली होती. अंकिता म्हणाली होती, “मला वाटतं की मी आजारी आहे, मला आतून जाणवत आहे की माझी तब्येत बरी नाही. मला मासिक पाळी येत नाहीये. मला घरी जायचे आहे; एवढंच नाही तर अंकिताने बिग बॉसच्या घरात प्रेग्नन्सी टेस्टही केली होती.
अंकिता लोखंडेच्या वागण्यावरून, बोलण्यावरून अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. काही दिवसांपूर्वीच अंकिताने बिग बॉसच्या घरात प्रेग्नन्सी टेस्ट केली होती. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एवढंच नाही तर तिला आंबट खावसं वाटतंय असंही ती म्हणाली होती. आता अंकिता खरच गरोदर आहे की नाही, याबाबतचा खुलासा नावेद सोलने केला आहे. नुकतंच नावेदचे बिग बॉसमधून एलिमिनेशन झाले. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर नावेदने अनेक खुलासे केले आहेत.