मुंबई : कलर्स टीव्हीवरचा ‘बिग बॉस 17’ या रियालिटी शोचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे. कलर्सचा हा शो महिनाभरापूर्वी ऑन एअर झाला होता. या शोमध्ये एकीकडे स्पर्धक प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे ‘बिग बॉस’ही शोमध्ये एक-एक ट्विस्ट आणत आहेत.
‘बिग बॉस’ने शेवटच्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना ‘दिल के मकान’मधून वेगळे केले. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. मात्र, आता पुन्हा एकदा बिग बॉस शोमध्ये नवा ट्विस्ट घेऊन येत आहे. यावेळी पाच जण घराबाहेर पडू शकतात आणि शोमध्ये मोठा बदल होऊ शकतो. ‘बिग बॉस’मधून एकाच वेळी पाच जणांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. बिग बॉसच्या या सीझनच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना स्पर्धकांमध्ये भांडणे पाहायला मिळत आहेत.
‘बिग बॉस’चे अपडेट देणाऱ्या एका पेजने नुकतीच सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. यामध्ये मेकर्सना सध्या कोणताही कंटेंट मिळत नाही, त्यामुळे पुढील आठवड्यात ‘बिग बॉस’मध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. रिपोर्ट्सनुसार, पुढील आठवड्यात यातील पाच स्पर्धकांना शोमधून बाहेर काढले जाऊ शकते. असे जरी तरी हे एपिसोड प्रसारित झाल्यानंतर सर्वांना समजणार आहे.