नवी दिल्ली: बिग बॉस सीझन 17 सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे. पण अलीकडेच या शोबाबत अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसेल. नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने या शोच्या बेकायदेशीर प्रसारणावर बंदी घातली आहे.
वायाकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. वायाकॉम 18 मीडियाने आपल्या याचिकेत म्हटले की, अनेक वेबसाइट्स बेकायदेशीरपणे बिग बॉस शो प्रसारित करत आहेत. यावर आता न्यायालयाने उल्लंघन करणाऱ्या वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत आणि सांगितले की, वेबसाइटवर सामग्रीच्या बेकायदेशीर प्रसारणामुळे पायरसीला प्रोत्साहन मिळेल.
बिग बॉसच्या बेकायदेशीर प्रसारणावर बंदी
न्यायमूर्ती सिंह म्हणाले की, जर फिर्यादीला बिग बॉस नावाची किंवा कार्यक्रम बेकायदेशीरपणे प्रसारित करणारी कोणतीही वेबसाइट आढळली, तर या वेबसाइट्सच्या विरोधात अर्ज दाखल करून त्यांना पक्षकार बनवले जाईल. बिग बॉस हे नाव वापरणार्या अशा वेबसाइट्सना परवानगी दिल्यास ‘पायरसी’ आणि अनधिकृत प्रक्षेपणास प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे फिर्यादींचे मोठे नुकसान होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
आक्षेपार्ह वेबसाइट्सवर नियंत्रण न ठेवल्यास नुकसान होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. बिग बॉसचे नाव वापरणाऱ्या आणि वेगाने वाढणाऱ्या वेबसाइट्सना परवानगी दिल्यास पायरसीला प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे फिर्यादींचे मोठे नुकसान होईल. उल्लंघन करणाऱ्या वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देताना न्यायालयाने ही माहिती दिली.