पुणे : काही कंपन्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. या प्रकरणी बिग बींनी हायकोर्टात याचिका दाखल केली.यावर न्यायमूर्ती चावला यांनी निर्णय दिला आहे.
सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन यांच्या नावाने एक लॉटरीची जाहिरात फिरत आहे, ज्यात प्रमोशनल बॅनरवर बिग बींचा फोटो झळकतोय. याशिवाय त्यावर KBC चा लोगोही आहे. हे बॅनर लोकांची दिशाभूल करण्यासाठी कोणीतरी तयार केले आहे. यात अजिबात तथ्य नाही. याप्रकरणी अमिताभ बच्चन यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी याचिका दाखल होती.
अमिताभ बच्चन हे एक मोठे सेलिब्रिटी आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे नाव कोणत्याही प्रकारच्या प्रचारात वापरता येणार नाही. अभिनेत्याने जाहिरात कंपन्यांवर प्रसिद्धीच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या वकिलानेही न्यायालयाला सांगितले की, अभिनेता हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. अशाप्रकारच्या जाहिरातींमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व करणे, तेही त्यांच्या परवानगीशिवाय, हे चुकीचे आहे. जाहिरात कंपन्यांना अमिताभ बच्चन यांचे नाव आणि आवाज वापरायचा असेल तर ते अभिनेत्याच्या परवानगीनेच करू शकतात. अन्यथा अमिताभ बच्चन यांचे नाव कोणत्याही प्रकारच्या सेवेत वापरले जाऊ नये.
न्यायमूर्ती चावला यांनी प्राधिकरण आणि दूरसंचार विभागाला जे अमिताभ बच्चन यांचे पब्लिकली उपलब्ध असलेले नाव, फोटो आणि पर्सनॅलिटी ट्रेंट्स तात्काळ काढून टाकण्याचे आदेश जारी केले आहेत.