Avdhut Kulkarni : पुणे : मिमिक्री करणे ही एक कला आहे. एखाद्या व्यक्तीच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करणे म्हणजे मिमिक्री. पूर्वी गायन किंवा वाद्यवृंदाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य गायक वादकांना थोडी विश्रांती मिळावी आणि कार्यक्रम सुरू रहावा, या उद्देशाने मिमिक्री कलाकार त्यांची कला सादर करत असत. दरम्यान, हा प्रकार लोकप्रिय झाला. आता मिमिक्री ही कला लोकांपर्यंत पोहोचली असून, लोकांनी ती आवडू लागली आहे. त्याचे आता स्वतंत्र कार्यक्रम होतात. पिंपरी-चिंचवडमधील असाच एक मिमिक्री कलाकार शरद पवार, राज ठाकरे, अजित पवार, दादा कोंडके, मकरंद अनासपुरे, रामदास आठवले, निळू फुले यांच्यासह ५० दिग्गजांची उत्तम मिमिक्री करतो. सध्या त्याच्या मिमिक्री कौशल्याची राजकारणात हवा झाली आहे.(Avdhut Kulkarni)
एखाद्या व्यक्तीच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करणे म्हणजे मिमिक्री
या हरहुन्नरी कलाकाराचं नाव आहे अवधूत कुलकर्णी. अवधूत हा मुळचा धाराशिव येथील रहिवाशी आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं अवधूतला दहावीनंतर शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पण म्हणतात ना, कलेशी जडलेली मैत्री आपल्याला जगायला शिकवते. अवधूतसाठी त्याची कला हाच पोटापाण्याचा उद्योग बनला. (Avdhut Kulkarni)शिक्षण सोडले तरी तो हिंमत हरला नाही. त्यानं मिमिक्री क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवण्याचं ठरवलं. त्यासाठी सहकुटुंब पुणे गाठलं आणि या क्षेत्रातील प्रवासाला सुरूवात केली.(Avdhut Kulkarni)
अवधूत आज एक-दोन नव्हे तर तब्बल ५० हून जास्त प्रसिद्ध व्यक्तींचे हुबेहुब आवाज काढतो. त्यासाठी आवाजात स्पष्टता आणि लवचिकता, अभिनय कौशल्य, तांत्रिक ज्ञान, वाचन प्रवाह अशी सगळी आवश्यक कौशल्य तो शिकला आहे. याचबरोबर तो अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं अँकरींग देखील करतो. महिलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी होम मिनिस्टरसारखे विविध उपक्रमदेखील राबवितो. . या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.(Avdhut Kulkarni)
शरद पवार, राज ठाकरे, अजित पवार, दादा कोंडके, मकरंद अनासपुरे, रामदास आठवले, निळू फुले यांच्यासह ५० दिग्गजांची अवधूत मिमिक्री करतो. या मिमिक्रसाठी त्याला कसून मेहनत करावी लागते. ‘चांगल्या आवाजातील अभिनयासाठी खूप मेहनत, संयम, जिद्द आणि चिकाटी आवश्यक आहे. मिमिक्री म्हणजे पानावरचे शब्द वाचणे नाही. त्यासाठी उत्तम अभिनय कौशल्य देखील लागतं. अभिनय कौशल्य असेल तर तुम्हाला अधिक आत्मविश्वास येतो आणि तुमची कला इतरांपर्यंत लवकर पोहचते, असा अनुभव अवधूतनं सांगितला.(Avdhut Kulkarni)