मुंबई: बिग बॉस मराठीचे यंदाचे पाचवे पर्व सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. बिग बॉसच्या आठव्या आठवड्यात भाऊचा धक्का चांगलाच गाजला गेला. अशातच अरबाज पटेल या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात अरबाजने आपल्या स्टाईल आणि स्वॅगने चाहत्यांना घायाळ केलं आहे. जिगरबाज तरुणाने बिग बॉस मराठीच्या घरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. निक्की आणि त्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. परंतु आता बिग बॉस मराठीच्या घरातला त्याचा प्रवास संपला आहे. अरबाजला कमी मत देऊन अखेर रसिक प्रेक्षकांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
अरबाज आणि निक्की हे शेवटच्या क्षणी डेंजर झोनमध्ये होते. प्रेक्षकांना एका क्षणाला वाटलं होतं, दोघांना डेंजर झोनमध्ये नेऊन इलिमिनेशची हुलकावणी दिली जाईल. पण तसे काहीच घडले नाही आणि सरळ सरळ बिग बॉसने अरबाजला घराबाहेर काढले. या दरम्यान निक्की तंबोळी अरबाजच्या गळ्यात पडून प्रचंड रडली. तिने बिग बॉसला अरबाज सेव्ह करण्याची विनंती देखील केली. पण अखेर बिग बॉसने त्याला बाहेर काढलचं.
दरम्यान, या आठवड्यात बिग बॉस मराठीमधून दोन स्पर्धक बाहेर पडले आहेत. संग्राम चौगुले वैद्यकीय कारणांमुळे घराबाहेर पडला तर अरबाज पटेल एलिमीनेट झाला. आता लवकरच बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram