पुणे : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनुरागने लेकीच्या हळदीचे फोटो त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.
अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप नेहमीच तिच्या हटके आणि बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून आलिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 2023 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी आलियाने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरशी साखरपुडा केला होता. आता साधारण वर्षभराने हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, आलियाचं लग्न मुंबईतील महालक्ष्मी रेसकॉर्स येथे पार पडणार आहे. आलिया तिच्या सोशल मीडियावर शेनसोबतचे बरेच फोटो शेअर करत असते. अनुराग कश्यपचा जावाई हा एक उद्योजक असून तो मूळचा अमेरिकेचा आहे. 24 व्या वर्षीच तो उद्योजक म्हणून नावारुपाला आला आहे.
अनुराग कश्यप बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचे ब्लॅक फ्रायडे, नो स्मोकिंग, देव डी, गुलाल, दॅड गर्ल ईन यलो बुट्स आणि गँग्स ऑफ वासेपूर हे चित्रपट लोकप्रिय झाले आहेत.
दरम्यान, आलिया आणि शेनच्या साखरपुड्याला खुशी कपूर, सुहाना खान, अगस्त्य नंदा, इब्राहिम अली खान, पलक तिवारी असे सगळे स्टारकिड्स उपस्थित होते.