आवड असलेल्या क्षेत्रात काम कारण्यासठी संधी मिळाली कि माणूस त्या संधीचे नक्कीच सोने करतो. कित्येकांना ही संधीच मिळत नाही. मात्र, हिंगोली सारख्या दुष्काळी भागातून आलेल्या एका तरुणाला ही संधी मिळाली, आणि पहाता पहाता तो, हिप् होप आर्टिस्ट म्हणून नावारूपाला आला. स्वता: ची स्वतंत्र शैली विकसित करून हा तरुण पोचला थेट आंतरराष्ट्रीय मंचावर…आणि प्रणव चव्हाणचा झाला, सुपरस्टार प्रिन्स डार्की… !!!!
Insta : https://to.mysocial.io/s/F-aXWFn_f
प्रणव चव्हाण, हे तसं महाराष्ट्रातील एका सामान्य तरुणाचं सामान्य नाव…. याचं मूळ गाव म्हणजे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील एक छोटंसं गाव किन्होळा. वडील भगवान चव्हाण सैन्यदलात असल्याने सातत्याने फिरतीवरच. याचा जन्म देखील जम्मू काश्मीर मधला. त्यानंतर वडील सैन्यदलातून निवृत्त झाले आणि त्यांनी मुंबई पोलीस दलात मिळालेली नोकरी स्वीकारली. आई सुनीता यांनी मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. मोठ्या भावाने देखील जिद्दीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करत अभियंता बनला.
घरातील सगळ्यात छोटा असणारा सदस्य म्हणजे प्रणव… शालेय जीवनापासूनच प्रणवला गाण्याची प्रचंड आवड होती. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये असलेला प्रणव मधून विविध शालेय स्पर्धामध्ये उत्साहाने आपला सहभाग नोंदवत असे. शालेय शिक्षणाबरोबरच त्याला फुटबॉल, बास्केटबॉल या खेळांची आवड होती.
उच्च माध्यमिक शिक्षणानंतर प्रणव पुढील अभ्यासासाठी परदेशात गेला… अन त्याने मानसशास्त्र विषयातून २०२१ साली मेट्रोपोलिया युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस हेलसिंकी फिनलँड ,युरोप मधून पदवी पूर्ण देखील केली. पण मनातून गाणं गाण्याची इच्छा प्रणवला शांत बसू देत नव्हती. एका बाजूला पदवीचा अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला गाण्याचा रियाज… या दोन्ही गोष्टी प्रणवने अगदी रेल्वेच्या रुळासारख्या हाताळल्या.. अगदी समतोल…
प्रणवाचा आवाज हा नेहमीच एखाद्या रॉकस्टारला शोभेल असाच होता. युरोपात असल्याने त्याची ओळख ही पॉप संगीताशी झाली… मग पॉप संगीतच प्रणवचं आयुष्य बनलं…!!!
पॉप आर्टिस्ट म्हणून प्रणवने गायला सुरुवात केली आणि त्याच्यातील गायकाला प्रिन्स डार्की ही नवी ओळख मिळाली. त्याच्या शैलीला, त्याच्या आवाजाला आणि त्याच्या गाण्याच्या लकबींनी युरोपियन चाहत्यांवर मोहिनी घालायला सुरुवात केली. एका चांगल्या बँड सोबत काम करताना प्रणवने आता पर्यंत युरोप पासून मुंबई, पुण्यापर्यंत ३० पेक्षा जास्त शो केले आहेत. त्याच्या गायकीला आता भारतीय चाहत्यांनी देखील पसंती द्यायला सुरुवात केली आहे.
प्रिन्स डार्कीचे पहिले गीत ‘होल्ड मी टाईट’ हे २०२१ साली युट्युब वर प्रसिद्ध झाले आणि चाहत्यांच्या फिनिक्स पक्षाने गगनभरारी घेतली. येत्या डिसेंबर महिन्यात आपल्या मराठमोळ्या प्रणव म्हणजेच प्रिन्स डार्कीचा ८ गाण्याचा अल्बम प्रसिद्ध होतोय.. या अल्बम नंतर कदाचित सध्या इंट्राग्राम वर असणारे १ लाख फॉलोवर्स नक्कीच १० लाखांच्या पुढे जातील, असा विश्वास त्याच्या गायकीने निर्माण केला आहे.
प्रणव सद्या संभाजीनगर कदम वाकवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे येथे कुटुंबासोबत राहत असून या गुणी कलाकाराने मिळविलेल्या यशासाठी सर्वांकडून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा…. !!!