मुंबई : बॉलिवूडचे बिग बी या वयातही चांगले सक्रीय आहे. सोशल मीडिया असो किंवा चित्रपट असो रिलीझसाठी त्यांच्या चित्रपटांची रांग लागलेली आहे. अशातच सगळ्यांना अचंबीत करणारे त्यांचे एक व्रत समोर आले आहे. ते करायलाही खूप कठीण आहे. या व्रतात ते तब्बल ४१ दिवस संन्याचे जीवन जगले. त्यात आयुष्यातील अनेक गोष्टींचा त्याह करावा लागतो. मात्र, अमिताभ बच्चन यांनी ते काटेकोरपणे पूर्ण केले आहे.
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल नुकताच मोठा खुलासा झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी संन्यास घेतला होता. यात ते कुटुंबापासून दूर राहत, संन्यासीसारखी जीवन जगले. अमिताभ बच्चन यांनी ४१ दिवस संन्यास घेतला. त्यांनी ४१ दिवस त्रिदंडी संन्यास घेतला होता. यामध्ये तुम्हाला विविध नियमांचे पालन हे करावे लागते.
केरळमध्ये सबरीमाला नावाचे एक ठिकाण आहे. तिथे स्वामी अय्यपा आहेत. तिथे ४१ दिवसांसाठी उपवास ठेवावा लागतो. यादरम्यान आपल्याला तिथे गेरूए कपडे घालावी लागतात. हेच नाही तर दारू आणि मांसाहार करायला अजिबात चालत नाही. तिथे तुम्ही फॅमिली लाईफ ही जगू शकत नाहीत. तिथे संन्यासासारखे जीवन जगावे लागते.
फक्त हेच नाही तर तिथे चप्पल आणि शूजही घालायला जमत नाही. जमिनीवर झोपावे लागते. शबरीमालाच्या यात्रेवर जावे लागते. चाळीस किलो मीटर चालावे देखील लागते. डोंगरावर चढावे लागते. यामुळे ते व्रत करणाऱ्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. मात्र, अमिताभ बच्चन यांनी हे फक्त श्रध्देसाठी केले. त्यांनी कोणत्याही प्रकारची मन्नत मागितली नव्हती.