पुणे : ‘पुष्पा’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे ‘पुष्पा 2’ साठी पूजा ठेवली होती. त्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची माहिती दिली आहे.चित्रपट प्रेक्षकांना आवडावा यासाठी निर्मात्यांनी स्क्रिप्टिंगसाठी बराच वेळ दिला आहे.
‘पुष्पा द राइज’च्या यशानंतर निर्मात्यांना ‘पुष्पा 2’आणखी ग्रँड लेव्हलवर रिलीज करायचा आहे. यासाठी चित्रपटाचे बजेट वाढवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या दुस-या भागात प्रेक्षकांना दमदार अॅक्शन पाहायला मिळेल, असा विश्वास आहे, चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.
सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये अजूनही कायम आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनने त्याचा फोटो शेअर केला होता, त्यावरुन त्याचा हा लूक पुष्पा 2मधील असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला होता. रश्मिका मंदान्नाने तिच्या इन्स्टाग्रामवर पूजेचा एक फोटो शेअर केला करत ‘लेस्ट गो’ असे लिहित आपला आनंद व्यक्त केला.
‘पुष्पा द रुल’पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्याची शक्यता आहे. चित्रपट निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये चित्रपटाच्या शूटिंगबाबत अपडेट्स देण्यात आले होते. पोस्टमध्ये लिहिले होते, ‘भारतातील मोस्ट अवेटेड फिल्म पुष्पा द रुलची पूजा सेरेमनी उद्या आहे.’ निर्मात्यांनी पुढे लिहिले होते की, ‘चित्रपटाचा सिक्वेल भव्य असणार आहे.’