मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ‘पुष्पा 2’ प्रीमियर शोमच्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला होता. आज त्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण ?
हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण चिघळलं होतं. आता या प्रकरणी त्याला अटक झाली आहे.
अल्लू अर्जुनला चिकलाडपल्ली पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. यावेळी पोलीसांनी सांगितले की, “या प्रकरणात दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल”. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.