सुरेश घाडगे
परंडा : आलेश्वर ( ता. परंडा ) या दुर्गम गावातील छोट्याशा खेडे गावातील युवकाने प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन आवाजातील सुराने ऊदोन्मुख गायक सोहील सादिक मुलाणी याने कलर्स मराठी वाहिनीवरुन प्रसारित होत असलेल्या ” सुर नवा, ध्यास नवा” या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांची व परिक्षकांची मने जिंकत यशाला गवसणी घातली आहे.
रविवार दि.२४ जुलै रोजी कलर्स वाहिनीवरील कार्यक्रमात सांयकाळी ७ वाजता सोहेल मुलानी गाताना प्रेक्षकांच्या भेटीस दिसणार आहे.चिकाटी अन् जिद्दीच्या बळावर सोहेलने यश संपादन केल्याने सर्वञ अभिनंदन व कौतूक होत आहे.
अलेश्वर (ता.परंडा जि. उस्मानाबाद) येथील एका सामान्य कुंटुबातील उदोन्मुख गायक सोहील मुलाणी यास लहान पणापासुन गीत संगीताचा आवड होती .त्याने प्रतिकुल परिस्थितीचा संघर्ष करीत गीत गायनाची आवड जोपासली.सोहेल हा स्वरबध्द आवाजातुन हिंदी,मराठी चिञपटातील गाणी ,लोकगीते गाऊन प्रेक्षक श्रोत्यांचे मनोरंजन करीत असे.अलेश्वर गावातील स्वर संगम बॕन्जो बॕण्डपथकात गायक म्हणुन काम करीत होता.
दरम्यान, लग्नसराई,विविध कार्यक्रमात गावोगावी जावुन गायाकीच्या पैशातुन कुंटुबाला हातभार लावत होता. सुमधुर आवाजात माईकवरुन गाणे गायचा . त्यातुन बक्षिस मिळवायचा.गाताना गाण्याचा गीतकार,संगीतकार,गायक यांची नावे सांगत . बॕण्डपथकात गाताना प्रेक्षकांची दाद मिळायची.सोहेलने गाण्याच्या सवयीने संगीत आपलेसे केले. सोहीलला सध्या मराठी कलर्स वाहिनीवरील “स्वर नवा,ध्यास नवा” या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली आहे.
सध्या सोशल मिडीयावर कार्यक्रमातील आॕडीओ क्लिप गाजत आहे.या कार्यक्रमाचे परिक्षक सुप्रसिध्द गितकार गायक अवधुत गुप्ते यांनी सोहीलच्या गायकीची मोठी प्रशंसा केली आहे. चंदन कांबळे यांनी त्यास प्रोत्साहन देवुन मार्गदर्शन केले आहे. सोहेलचे शिक्षण गायन विशारद एम. ए. म्युजिक(करमाळा जि. सोलापुर) येथे सुरु आहे.