पुणे : अभिनेता अक्षय कुमार नेहमीच आपल्या सिनेमाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक विषय हाताळत असतो. ‘टॉयलेट एक प्रेम कथा (Toilet Ek Prem Katha), पॅडमॅन (Padman), ओ माय गॉड (Oh My God) सारखे विविध सिनेमांना अक्षयच्या फॅन्सने जोरदार पसंती दिली.
अक्षय कुमार लैगिक शिक्षणासारख्या गंभीर विषयावर चित्रपट बनविणार आहे. याबाबत त्याने ही माहिती सांगितले आहे. ‘भारतात लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे विविध अंधश्रध्दा, गुन्हे किंवा विविध समस्या निर्माण होताना दिसतात. लाजेपोटी कुणीही या विषयांवर मोकळेपणाणे बोलताना दिसत नाही,’ असे अक्षय कुमार म्हणाले.
आता अक्षय कुमारने रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Red International Film Festival) ही मोठी घोषणा केली आहे. अक्षय कुमार लैगिक शिक्षणासारख्या (Sex Education) गंभीर विषयावर सिनेमा बनवण्याच्या विचारात आहे, असे अक्षय कुमार यांनी सांगितलं.
भारतात लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे विविध अंधश्रध्दा, गुन्हे किंवा विविध समस्या निर्माण होताना दिसतात. लाजेपोटी कुणीही या विषयांवर मोकळेपणाणे बोलताना दिसत नाही. पण आता खिलाडी कुमार थेट या नाजुक विषयाला हात घालत अक्षय कुमार मोठ्या पडद्यावरचं लैगिक शिक्षण देणार आहेत.
रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या मंचावर अक्षय कुमार म्हणाला, “लैंगिक शिक्षण हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. पण तरीदेखील या विषयाची दखल घेतली जात नाही. जगातील प्रत्येक शाळेत हा विषय शिकवला गेला पाहिजे असं मला वाटतं. पण मी माझ्यापद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त हा सिनेमा प्रदर्शित व्हायला थोडा वेळ लागेल. पण हा माझ्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी एक सर्वोत्कृ्ष्ट सिनेमा असेल,”