मुंबई: अजय देवगण वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. कारण आहे त्याचे आगामी चित्रपट, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी त्याचे तीन चित्रपट येत आहेत, ते म्हणजे ‘सिंघम अगेन’, ‘औरों में कहाँ दम था’ आणि ‘रेड 2’. तिन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र, निर्माते कोणत्या ना कोणत्या कारणाने चित्रपट पुढे ढकलत आहेत. बरं, याशिवाय त्याच्या खात्यात अनेक मोठ्या चित्रपटांचे सिक्वेलही आहेत. नुकतेच ‘दे दे प्यार दे 2’चे शूटिंग सुरू झाले. दरम्यान, त्याच्या पुढच्या मोठ्या चित्रपटाचे अपडेट मिळाले आहे.
अजय देवगणचा एक चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. नाव होतं- सन ऑफ सरदार. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि सलमान खानसह अनेक मोठे स्टार्स दिसले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याच्या सीक्वलची तयारीही सुरू झाली आहे. विजय कुमार अरोरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
12 वर्षांनंतर अजय देवगण ‘या’ अभिनेत्याशी भिडणार!
नुकतेच मिड डे मध्ये एक वृत्त प्रसिद्ध झाले. संजय दत्तने विजय कुमारच्या या चित्रपटाला होकार दिल्याचे समोर आले आहे. तो या प्रोजेक्टमध्ये सामील झाला आहे. पण या सिक्वलमध्ये संजय दत्त पुन्हा एकदा बलविंदर सिंग संधूची (बिल्लू) भूमिका साकारणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर होय आणि नाही असे दोन्ही असे आहे. वास्तविक, सिक्वलसाठी एक नवीन कथा सादर करण्यात आली आहे, जी पहिल्या भागाच्या कथेपेक्षा खूपच वेगळी असेल. असे म्हटले जात आहे की, पहिल्या भागात बिल्लू आणि जस्सी यांच्या पात्रांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती, त्यामुळे दोघेही एकच भूमिका साकारताना दिसतील अशी अपेक्षा आहे.
‘सन ऑफ सरदार’मधील संजय दत्त आणि अजय देवगण यांच्यातील जुगलबंदीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. जेव्हा जेव्हा ते दोघे चित्रपटात भिडले तेव्हा खूप मनोरंजक परिणाम दिसले आहेत. यावेळी या दोघांमध्ये आणखी टक्कर पाहायला मिळणार असल्याचे या रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. या चित्रपटात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे. मात्र, ऑफ स्क्रिन हे दोघेही कलाकार खूप जवळचे मित्र आहेत. अजयने देखील सांगितले की, दुसऱ्या भागात संजय दत्तची भूमिका जबरदस्त असणार आहे.
दरम्यान, विजय कुमार अरोरा जुलैच्या अखेरीस या ॲक्शन कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. अजय देवगण, संजय दत्तशिवाय मृणाल ठाकूर या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर स्कॉटलंडमध्ये ५० दिवसांच्या शुटिंगचे वेळापत्रक लवकरच सुरू होईल.