शशांक केतकर आता धर्मा प्रोडक्शनच्या सीरिजमध्ये दिसणार आहे. 8 मार्चपासून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच तो ‘स्कॅम-2003’ या वेबसीरिजमध्ये झळकला होता. त्यात आपल्या कामाची छाप पाडल्यानंतर आता त्याचा नवा प्रोजेक्ट सुरू होतोय.
शशांक केतकर ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून घराघरात आणि लोकांच्या मनात पोहचला होता. त्याने साकारलेली श्रीरंग गोडबोले ही भूमीका प्रेक्षकांना भावली होती. छोट्या पडद्यावर सुपरहिट झालेल्या शशांकने त्यानंतर चित्रपटातही भूमिका साकारल्या. शशांक केतकर धर्मा प्रोडक्शनच्या ‘शो टाईम’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहेत.
शशांक केतकरने सोशल मीडियामध्ये आपल्या नव्या सीरिजबद्दल पोस्ट लिहिली आहे. शशांकने या नव्या शोचे नाव ‘शो टाईम’ आहे. हा शो 8 मार्चपासून ‘हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असणार आहे. शशांकने म्हटले की, धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी गेलो तेव्हाच जाणवलं ‘कुछ कुछ होता है’ माझी भूमिका लहानशी आहे पण, प्रेक्षकांसाठी ही भूमिका नक्कीच लक्षवेधी ठरेल, असा विश्वासही शशांकने व्यक्त केला.
‘स्कॅम 2003’ मध्ये शशांकने सोडली छाप
असलेल्या स्कॅम 2003 या वेब सीरिजमध्ये शशांक केतकरने जयंत करमरकर उर्फ जेके या व्यक्तीरेखेची भूमिका साकारली होती. तेलगी स्टॅम्पपेपर घोटाळ्यावर आधारीत ही वेब सीरिज आहे. शशांक केतकरने स्कॅम 2003 या वेब सीरिजमध्ये साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले होते.
‘शो टाइम’ सीरिजमध्ये मौनी रॉय, श्रिया सरन, इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल यांसारखे दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. ‘धर्माटिक एंटरटेन्मेंट’ या करण जोहरच्या धर्मा प्रो़डक्शन कंपनीच्या अखत्यारीत या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. मिहीर देसाई आणि अर्चित कुमार यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजमध्ये नेपोटिज्म आणि सिनेइंडस्ट्री यांच्यातील सत्तासंघर्षावर कथा असल्याचे म्हटले जात आहे.