सध्या ओटीटीवर भूमी पेडणेकरचा ‘भक्षक’ चांगली कामगिरी करत आहे. ‘भक्षक’ या चित्रपटामुळे अभिनेत्री चर्चेत आहे. आता भूमी पेडणेकर सीमोल्लंघन करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. भूमी पेडणेकर हॉलिवूडमध्ये काम करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तशी तिची आधीपासून इच्छाही होती. तिला हॉलिवूडमधील काही मोठ्या प्रोडक्शन हाऊसकडून विचारणा होत आहे.
भूमी पेडणेकरने आत्तापर्यंत ‘दम लगा के हैशा’, टॉयलेट:एक प्रेमकथा, शुभमंगल सावधान, लस्ट स्टोरी (वेब सीरिज), सोनचिरिया, सांड की आँख, बाला, बधाई दो, भीड, अफवाह अशा चित्रपटांमधून भूमीने आपली छाप सोडली आहे. भूमी पेडणेकर बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये जाण्यास सज्ज आहे. काही प्रोडक्शन हाऊसने तिच्याशी संपर्क साधला आहे. या काही प्रोडक्शन हाऊससोबत कदाचित मार्च किंवा एप्रिल मध्ये भूमी लॉस एंजलिसमध्ये मीटिंगसाठी जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जवळपास 9 वर्षांमध्ये भूमीने आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भुमीकांच्या व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. आता तिच्या चित्रपटांनी जागतिक पातळीवरही लक्ष वेधून घेतल्याचे तिली आलेल्या ऑफर्समुळे समोर आले आहे. भक्षक चित्रपट जागतिक पातळीवर ट्रेंड करत आहे. तिने आपल्या कामातून हॉलिवूडमधील लोकांचे लक्ष वेधून घेतले असल्याचे ट्रेड सूत्रांनी सांगितले.