मुंबई : रिचा चड्ढा व अली फझल यांच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालेलं आहे. दोन दिवसांआधी म्हणजेच 16 जुलै रोजी अभिनेत्रीने तिच्या पहिल्या गोंडस अशा मुलीला जन्म दिला.
सोशल मीडिवर ही आनंदाची बातमी शेअर करत म्हणाली की, “16 जुलै 2024 रोजी आमच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. आमचं कुटुंब प्रचंड आनंदी आहे. आम्ही आमच्या शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल कायम आभारी आहोत.”
रिचा चड्ढा व अली फझल यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. या जोडप्याने 1+1 = 3 असं कॅप्शन लिहिलेला एक फोटो शेअर केला होता. गेल्या काही दिवसामध्ये रिचाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मॅटर्निटी शूटमधील काही सुंदर फोटो शेअर केले होते. रिचाने अलीबरोबर मॅटर्निटी फोटोशूट केलं.
अली व रिचाच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचं झाल्यास, दोघेही पहिल्यांदा ‘फुकरे’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते, नंतर ते प्रेमात पडले. अली व रिचा यांनी जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. रिचाने सांगितलं होतं की तिने व अलीने 2020 मध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केलं होतं. आता लग्नानंतर चार वर्षांनी ते दोघेही आई-बाबा झाले आहेत.