पुणे : ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतचं लग्नबंधनात अडकली आहे. ‘आयुष्याची नवी सुरुवात’ असं कॅप्शन देत रेश्माने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पुण्यात अभिनेत्रीचा शुभविवाह सोहळा संपन्न झाला आहे. अभिनेत्रीच्या लग्नाच्या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
समोर आलेल्या फोटोंमध्ये रेश्मा आणि पवन यांचा पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रेश्मा आणि वर पवन यांचा लग्नासाठीचा मराठमोळा लूक खूप खास आहे. रेश्मा शिंदेने लग्नात गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तर तिच्या नव-याने शेरवानी, धोतर अन् रेश्माच्या साडीला मॅचिंग गुलाबी रंगाचं उपरणं परिधान केलयं. रेश्माने दागिन्यांचा श्रृंगार केला असून ती खूप सुंदर दिसतेय.
बरेच दिवसांपासून रेश्माच्या लग्नाची चर्चा सुरु होती. रेश्माने तिच्या नवऱ्याबाबत काहीचं उघड केले नव्हते. अखेर काल अभिनेत्रीच्या हळदीदिवशी तिच्या नवऱ्याचा फोटो समोर आला. रेश्माने तिच्या हळदीदिवशी शेअर केलेल्या फोटोंमध्ये नवऱ्याची झलक चाहत्यांना दिसली. याचदरम्यान अभिनेत्री आणि तिचा नवरा पवन या दोघांचीही जोडी सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram