मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. राधिका आपटे वयाच्या 39 व्या वर्षी राधिका आई होणार आहे. राधिका आपटेनं शेअर केलेल्या पोस्ट मध्ये ती गरोदर असल्याचं कळाल्यानं तिच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे.
राधिकाने बीएफआय लंडन फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. यावेळी काढलेले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिने गरोदर असल्याचा कोणताही उल्लेख केला नसला तरी रेड कार्पेटवर पोज दिलेल्या फोटोमध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. यावेळी राधिका काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसून आली. राधिकावर सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, राधिका आपटेने 2012 साली ब्रिटिश वायलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं आहे. 2011 साली राधिका कंटेम्परी डान्स शिकण्यासाठी लंडनला गेली होती त्यावेळी या दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघं एकत्र राहायला लागले. आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.