पुणे प्राईम न्यूज: अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या मालदीवमध्ये व्हेकेशनचा आनंद घेत आहे. लग्नानंतर परिणीती पहिल्यांदाच व्हेकेशनवर गेली असून विशेष म्हणजे तिचा पती राघव चढ्ढा हे तिच्यासोबत गेले नाहीत. इंस्टाग्रामवर व्हेकेशनची स्टोरी पोस्ट करत परिणीतीने स्पष्ट केले की, ती गर्ल्स ट्रिपचा आनंद घेत आहे. तिने स्वतःचा एक सुंदर फोटो पोस्ट करून अभिनेत्रीने कोणासोबत सुट्टी घालवत आहे, हे उघड केले आहे.
परिणीती चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या छायाचित्रात परिणीती काळ्या रंगाचा स्विम सूट घालून पूलमध्ये दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्री तिच्या बांगड्याही फ्लॉंट करताना दिसत आहे. परिणीतीने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘मी हनीमूनवर नाही, फोटो माझ्या वहिनीने क्लिक केला आहे.’ तिच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट होते की अभिनेत्री मालदीवमध्ये राघव चढ्ढा यांच्या बहिणीसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. राघव चड्ढा यांची बहीण देखील त्यांच्याप्रमाणेच चार्टर्ड अकाउंटंट आहे.
View this post on Instagram
नुकतीच परिणिती चोप्रा लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक दिसली. लग्नानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच रॅम्पवर चालली. यावेळी तिच्या नववधूच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, परिणीती चोप्रा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटात दिसली आहे. यानंतर ती तिच्या आगामी ‘अमर सिंह चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2024 साली प्रदर्शित होणार आहे.