पुणे : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांचे आज 10 ऑगस्ट सकाळी राहत्या घरी निधन झाले आहे. ते 67 वर्षाचे होते. विजय कदम हे गले दीड वर्ष कर्करोग आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. कदम यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
विजय कदम यांनी बालकलाकार म्हणून सिनेविश्वात पदार्पण केले. ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बाल नाटकात हवालदाराची भूमिका साकारुन त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर सिनेविश्वात त्यांनी त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरुच ठेवला. विनोदी अभिनयाने त्यांनी आजवर प्रेक्षकांना खळखळवून हसवले. आज हा हास्यवीर काळाच्या पडद्याआड गेला आहे.
विजय कदम यांनी रंगभूमी तसेच मराठी चित्रपटात काम केलं आहे. यांनी 1980 च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारुन आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. हळद रुसली कुंकू हसलं, पोलीसलाईन, चष्मेूबहाद्दूर असे अनेक चित्रपट खूप गाजवले आहे. या बातमीनंतर समजल्यावर अनेक कलाकार त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.