मुंबई : माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये चिंतेच वातावरण पसरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकीचे प्रकरण चर्चेत असताना अशातच आता शाहरुख खानलासुद्धा धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शाहरुख खानला धमकी मिळाली असून, त्यात कोट्यवधी रुपये द्या नाही दिले तर जीवे मारुन टाकू असं म्हटलं आहे. पोलिसांनी धमकीचा कॉल ट्रेस करत लोकेशन शोधलं आहे. यामध्ये ही व्यक्ती छत्तीसगडमधील रायपूर येथील असल्याचं समोर आलं आहे. शाहरुख खानला धमकीचा फोन रायपूरमधून आला होता, असे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. फैजान नावाच्या व्यक्तीने हा फोन केला होता. यानुसार मुंबई पोलीसांचे पथक रायपूर येथे रवाना झाले आहे.
पोलिसांनी अज्ञात आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 308(4) आणि 351(3)(4) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी कसून तपास सुरु असून आरोपींना लवकरच पकडलं जाईल, असे मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
Mumbai | Case registered against an unidentified person at Bandra Police Station in Mumbai for allegedly giving a threat to actor Shah Rukh Khan. Offence u/s 308(4), 351(3)(4) BNS registered. Details awaited.
(File photo) pic.twitter.com/wE0fdO8sd9
— ANI (@ANI) November 7, 2024