मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे, त्यापैकी एकाचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला आहे.
आज सकाळी पोलिसांनी हरियाणातून आणखी एकाला अटक केली आहे. ही या प्रकरणातील सहावी अटक आहे. हरपाल सिंह असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर हरपाल सिंह हा 37 वर्षांचा आहे.
मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हरियाणाच्या फतेहबादमध्ये हरपालच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
या प्रकरणात हरपालने मोहम्मद रफीक चौधरी याला आर्थिक मदत केल्याचे तसेच सलमान खान आणि आसपासच्या परिसरात रेकी करणे आणि कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.