बंगळुरू: लोकप्रिय कन्नड अभिनेता दर्शनला कामाक्षिपल्य पोलिसांनी एका हत्येप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी त्याला म्हैसूरमध्ये अटक केली असून चौकशीसाठी त्याला बंगळुरूला नेले आहे. चित्रदुर्गातील रेणुकास्वामी हत्याकांडात एका आरोपीने दर्शनचे नाव घेतले असून त्याच्या आधारे पोलीस कारवाई करत आहेत. दर्शन हा आरोपीच्या सतत संपर्कात होता, असा आरोप आहे. रेणुकास्वामी यांचा मृतदेह रविवारी (दि.९) सापडला होता .
पोलिसांनी सांगितले की, एका खून प्रकरणात एका आरोपीने दर्शनचे घेतले असून आरोपीने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी दर्शनला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार 10 हून अधिक लोकांची चौकशी सुरू आहे. रेणुकास्वामी चित्तदुर्गातील एका मेडिकल शॉपमध्ये काम होते. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते.
मिळालेल्या वृत्तानुसार, रेणुकास्वामी यांचे चित्रदुर्ग येथून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह शहराच्या पश्चिम भागातील कामाक्षीपल्य येथे सापडला. बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, “या प्रकरणी सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत. मृतदेहाची ओळख पटली असून तो चित्रदुर्गाचा रहिवासी आहे.
बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, “कन्नड अभिनेता दर्शन आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. “तपास अद्याप सुरू असल्याने, आम्ही आणखी कोणतीही माहिती देऊ शकत नाही.”
दर्शनचे कन्नड चित्रपट
दर्शन कन्नड चित्रपटसृष्टीतील अव्वल अभिनेता आहे. त्यांची चित्रपट कारकीर्द सुमारे 25 वर्षांची आहे. गेल्या काही वर्षांत त्याने‘मजेस्टिक’, ‘ध्रुवा’, ‘लंकेश पत्रिके’, ‘धर्मा’, ‘दर्शन’, ‘जोथे जोथेयल’, ‘सारथी’, ‘मिस्टर ऐयर्यवार्ता’, क्रांति और ‘काटेरा’ असे हिट चित्रपट दिले आहेत’. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कटेरा’च्या सक्सेस पार्टीदरम्यानही वाद झाला होता.