मुंबई: हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज झाले आहेत. येतोय महाराष्ट्राचा महानायक लवकरच, असं म्हणत ‘कलर्स मराठी’ने मालिकेची पहिली झलक आऊट केली होती. या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.
प्रोमो पाहताक्षणी काहीतर गूढ, थरारक असल्याचं जाणवते. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे, अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशोक मामा दिसत आहेत. याबाबत अशोक सराफ म्हणाले, मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकरने या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. ‘टन टना टन’ या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय.