पुणे : सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर येत आहे. अशातच आता ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गांवकर आणि सोशल मीडिया रील स्टार सोनाली गुरव हे दोघे आज (दि.26 नोव्हेंबर) रोजी विवाहबंधनात अडकले आहेत.
सोनाली आणि अभिषेक यांचा विवाहसोहळा मालवणात पार पडला आहे. दोघांच्या लग्नातील पहिला फोटो अभिनेता पियुष रानडे याने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. सोनाली-अभिषेकने लग्न सोहळ्यात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. नाकात नथ, हिरवा चुडा, सुंदर साडी या लूकमध्ये नववधू अतिशय सुंदर दिसत आहे.
दरम्यान, ‘सारं काही तिच्यासाठी’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेमुळे अभिनेता सर्वत्र चर्चेत आला. सोनाली गुरव ही सोशल मीडियावर विविध मजेशीर रील्स व्हिडीओ बनवत असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.