मुंबई : मागील काही महिन्यांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सतत सुरु आहे. दोघेही वेगळे राहत असल्याचे म्हटले जात आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक हे सतत त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे तूफान चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे सांगितले जातं आहे. मात्र, इतके दिवस यावर भाष्य करताना कोणीही दिसले नव्हते. आता घटस्फोटाच्या चर्चांवर थेट अभिषेक बच्चन याने भाष्य केले आहे. अभिषेक बच्चन याने यूके मीडियाला एक मुलाखत दिली आहे. यावेळीच तो ऐश्वर्या हिच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसला.
बॉलीवूड यूके मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, अभिषेक बच्चनला ऐश्वर्या राय बच्चनसोबत घटस्फोटाच्या अफवांवर विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना अभिषेकने आपली अंगठी दाखवली आणि आपण अद्याप विवाहित असल्याचे स्पष्ट केले. अभिषेकने असेही सांगितले की, या गोष्टीची विनाकारण, प्रमाणाबाहेर चर्चा करण्यात आली. एक सेलिब्रिटी म्हणून आम्हाला या चर्चांची किंमत मोजावी लागली असल्याचे अभिषेकने म्हटले.
अभिषेकने पुढे म्हटले की, “माझ्याकडे याविषयी तुम्हाला काही सांगण्यासारखे नाही. खेदाची गोष्ट आहे की, तुम्ही सर्वांनी या चर्चेला प्रमाणापेक्षा अधिक ताणून धरलं आहे. तुम्ही असे का करता ते मला माहिती आहे तुम्हाला काही बातम्या द्यायच्या असतात, हे पण ठीक आहे. आम्ही सेलिब्रिटी आहोत, त्याचा परिणाम होतो. मी अजूनही विवाहित आहे.