पुणे : प्रसिद्ध गीतकार आणि पटकथालेखक मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. मंगेश कुलकर्णी यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मंगेश कुलकर्णी यांनी गीतकार आणि पटकथाकार म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली.
‘आभाळमाया’ आणि ‘वादळवाट’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांच्या शीर्षकगीतांनी त्यांना ख-या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मंगेश कुलकर्णी यांच्या शब्दांची जादू आणि संगीताची जुळवाजुळव एक अद्वितीय संरचना होती. त्यांच्या गाण्यांनी अनेकांच्या मनातील भावनांना वाट मिळवून दिली. त्यांच्या गीतांमुळे प्रेक्षकांच्या मानतील अनेक आठवणी जिवंत राहिल्या.
मंगेश कुलकर्णी हे केवळ उत्कृष्ट गीतकारच नव्हते तर त्यांनी पटकथाकार म्हणूनही लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या कलेची थोडक्यात, विविधतेने समृद्ध असलेल्या चित्रपटांच्या यादीत ‘प्रहार’, ‘आवारा पागल दिवाना’, ‘मुस्तफा’, ‘येस बॉस’ यांचा समावेश आहे. शाहरुख खानच्या ‘येस बॉस’मध्ये त्यांनी पटकथालेखनाची जबाबदारी देखील स्वीकारली, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली.
मंगेश कुलकर्णी हे मुंबई पवईत वास्तव्यास होते. पण मागील अनेक दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव ते त्यांच्या बहिणीकडे भाईंदरला होते. शनिवार दुपारी साडे बाराच्या सुमारास मंगेश कुलकर्णी यांचे निधन झाले. मंगेश कुलकर्णी यांच्या जाण्याने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. मंगेश कुलकर्णी यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वातील मान्यवर त्यांना श्रद्घांजली देऊन शोक व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram