Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिनेता आस्ताद काळेचा संताप! भर प्रयोगात नाटक थांबवलं; नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 March 2026, 15:38

Aastad Kale : मुंबई: प्रसिद्ध मराठी अभिनेता आस्ताद काळे सध्या त्याच्या सविता दामोदर परांजपे या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकाच्या प्रयोगांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड पाहायला मिळत आहेत. मात्र माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरमध्ये या नाटकाचा प्रयोग सुरू असताना एक धक्कादायक प्रकार घडला. नाटकाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रवेश सुरू असताना प्रेक्षकांमधील एका व्यक्तीचा मोबाईल फोन वाजला. इतकेच नाही तर ती व्यक्ती चक्क मोठ्या आवाजात फोनवर बोलू लागली. यामुळे व्यत्यय आल्याने आस्ताद काळेचा संयम सुटला आणि त्याने नाटक अर्ध्यावरच थांबवले.

नाट्यगृहात नाटक सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांना मोबाईल फोन सायलेंट ठेवण्याच्या किंवा बंद करण्याच्या सूचना वारंवार दिल्या जातात. असे असूनही काही प्रेक्षक या नियमांचे पालन करत नाहीत. आस्तादने या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला. तो थेट रंगमंचाच्या समोरच्या बाजूला आला आणि त्याने फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकाला खडेबोल सुनावले. तो म्हणाला की आम्ही तुमच्या वतीने फोनवर बोलतो आणि तुम्ही स्टेजवर येऊन आमचे काम करा. अशा शब्दात त्याने आपली नाराजी व्यक्त केली. या प्रसंगानंतर आस्तादने पुन्हा आपल्या जागेवर जाऊन उपस्थित इतर सर्व प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली. नाटक मध्येच थांबवावे लागल्याबद्दल त्याने खेद व्यक्त केला आणि पुन्हा कामाला सुरुवात केली.

सांस्कृतिक कलादर्पणच्या व्यावसायिक नाट्य महोत्सवादरम्यान हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील अनेक ज्येष्ठ कलाकारांनी नाटकाच्या प्रयोगात मोबाईलमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

आस्तादने ज्या पद्धतीने शिस्त पाळण्याचे आवाहन केले, त्याचे अनेक नेटिझन्स आणि नाट्यप्रेमींकडून कौतुक होत आहे. कलाकारांच्या एकाग्रतेमध्ये अशा प्रकारे अडथळा निर्माण होणे चुकीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. रागाच्या भरातही त्याने नंतर दाखवलेला मोठेपणा आणि मागितलेली माफी यामुळे आस्ताद काळे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात ट्विस्ट! महिला कनेक्शन उघड, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी उचललं

Thursday, 1 October 2026, 12:52

बारामती नगरपरिषदेसमोर दुर्गंधीयुक्त पाणी, चिखल अन् कुजलेला कचरा; अ‍ॅड. अमोल सातकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

Thursday, 1 October 2026, 12:34

सिमल्यात जवान ड्युटीवर अन् इकडे घर साफ! लोणी काळभोर येथे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजारांवर डल्ला

Thursday, 1 October 2026, 12:16

शिरूर तालुक्यात दुसऱ्या कारवाईत टाकळी हाजी येथे लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात; ९५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Thursday, 1 October 2026, 12:14

थेऊरमध्ये जागेच्या वादातून नातवाकडून आजोबांना मारहाण; जीवे मारण्याची धमकी

Thursday, 1 October 2026, 12:10

तुमचं SBI अकाउंट, LPG कनेक्शन अन् NPS असेल तर लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून बदलले ‘हे’ नियम

Thursday, 1 October 2026, 12:00
Next Post
Lonikand News: Demand for 20 lakhs even after giving 5 lakhs; Beaten, starved; Mother gives shocking information in Pune dowry case...

Lonikand News: 5 लाख दिल्यानंतरही 20 लाखांची मागणी; मारहाण करायचे, उपाशी ठेवायचे; पुण्याच्या हुंडाबळी प्रकरणात आईने दिली धक्कादायक माहिती...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp