आदित्य बोराटे
Indapur News : इंदापूर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरात एका अनियंत्रित ब्रिजा कारने अक्षरशः थरार निर्माण केला. महामार्गाच्या कडेला झाडाखाली शांतपणे उभ्या असलेल्या तीन वाहनांना या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका रिक्षासह दोन कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Indapur News

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका ब्रिजा कारचा वेग अतिशय जास्त होता. इंदापूर शहरातून जात असताना अतिवेगामुळे चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, उभ्या असलेल्या तिन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. Indapur News
अपघातानंतर भीतीपोटी किंवा कारवाईच्या भीतीने ब्रिजा कार चालकाने आपले वाहन न थांबवता घटनास्थळावरून कारसह पलायन केले. सुदैवाने, ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी धडक बसलेल्या तिन्ही वाहनांमध्ये कोणीही प्रवासी किंवा चालक उपस्थित नव्हता, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. Indapur News
दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या अपघाताच्या आवाजामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. महामार्गावर अशा प्रकारे बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. Indapur News







